बेळगावमार्गे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादकडे गोमांस घेऊन जाणारे वाहन श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गोरक्षकांनी मध्यरात्री अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
काल, गुरुवारी रात्री श्री राम सेना, बजरंग दल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमार्गे हैदराबादकडे गोमांस घेऊन जाणारे वाहन हिरेबागेवाडीजवळ पहाटे दोनच्या सुमारास अडवून बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी 12 टन गोमांसाची वाहतूक करत होते. फ्लो
याबाबत अधिक माहिती देताना रवी कोकितकर व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, बेळगावमार्गे हैदराबादला गोमांस नेत असल्याची माहिती त्यांना मिळाली, गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग करून हिरेबागेवाडीजवळ गोमांस वाहतूक करणारे वाहन अडवले. सांगली-मिरज येथून हैदराबादला नेण्यात येत होते. परराज्यातून होणारी गोमांसाची वाहतूक निषेधार्ह असून, गोमांसाच्या वाहतुकीवर आळा घालावा, असा संताप अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री राम सेना, श्री राम सेना हिंदुस्थान, बजरंग दल व इतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments