Chikkodi

विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने उसवाहू ट्रॅक्टरला आग

Share

ऊस भरून घेऊन स साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरला वीजभारीत तारांचा स्पर्श झाल्याने आग लागून ऊस जळून खाक झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे घडली.

यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे कर्नाटक राज्यातून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आग लागली. दोन्ही ट्रॉलींनी पेट घेतला आणि मोठी आग लागली असली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

ही घटना लक्षात येताच चालकाने शहरातील एका खासगी शाळेच्या आवारात ट्रॅक्टर थांबवून आग पूर्ण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवाहर साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ सदलगा अग्निशमन दलाशी संपर्क साधला, अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग आटोक्यात आणली. कर्नाटकातून जवाहर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर ओव्हरलोड ऊस घेऊन जात होता. त्यामुळे मुख्य वीज वाहिनीचा स्पर्श उसाला झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. हा ट्रॅक्टर मल्लाप्पा धर्माप्पा बसन्नवर यांच्या मालकीचा असून, प्रदीप हरनाल हे चालक म्हणून काम करत आहेत.या घटनेची सदलगा पोलीस ठाण्यात नोंद झाली.

Tags: