वेदांत फाऊंडेशन, बेळगाव तर्फे “स्मार्ट शेतकरी” पुरस्कार वितरण सोहळा व कृषी उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थिती त्यातच रासायनीक खते व कीटनाशके यांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचा पोत घसरू लागला आहे. याचा परिणाम पीक वाढीवर होत असून जमिनिची सुपिकता कमी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे .
नापिक होत असणाऱ्या जमिनिवर पिके वाढविण्यासाठी बळीराजावर कसरत करण्याची वेळ आली आहे . अशावेळी हीच बाब लक्षात घेऊन शिक्षक व समाज सेवक यांनी मिळून बनलेल्या वेदांत फाऊंडेशन बेळगाव च्या सदस्यांनी जे शेतकरी शेणखत , गोमुत्र , गांडूळ खत , वनस्पतीजन्य खत यांचा वापर कृषी कार्यात करत जास्तीत जास्त पीक घेत मातीचा कस राखून ठेवत इतर शेतकरी बंधूना आदर्श निर्माण करतात अशा 29 गावातील शेतकऱ्यांना वेदांत फाऊंडेशन, बेळगाव तर्फे “स्मार्ट शेतकरी” पुरस्कार वितरण सोहळा व कृषी उत्पादनाचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठिक 10 वा. महिला विद्यालय हायस्कूल, बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, उद्घाटक म्हणून समृद्धी सेवा संस्थेचे सचिव विरेश किवडसन्नावर यांच्या हस्ते होईल. प्रमुख वक्ते म्हणून बी ई मॅकॅनीकल व एम.एस.इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट ,कोल्हापूर चे जयवर्धन माने हे उपस्थित राहणार आहेत तर
प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर शिवनगौडा पाटील, आय.एम.ई.आर. कॉलेज प्राचार्य, डॉ. आरीफ शेख, महेश फाऊंडेशन अध्यक्ष श्री महेश जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, समाज सेवक शिवाजी कागणीकर, मराठी शाळा क्र. 34, बेळगावचे सहशिक्षक रामकृष्ण पत्तार तसेच

प्रमुख अतिथी म्हणून एम.जी.एस. नं. 6, अनगोळ सहशिक्षिका जयश्री पाटील, एल.पी.एस. शाहू नगर सहशिक्षिका आस्मा गाडी, दड्डी प्राथमिक मराठी शाळा सहशिक्षक अंबाजी एम. बराटे,ग्राम पंचायत अध्यक्ष, बिजगर्णी मनोहर बेळगांवकर, माजी ग्राम पंचायत सदस्य, बेळवट्टी नारायण नलवडे हे असतील.
कीटकनाशक व खतामुळे जमिनीचा दर्जा घसरत आहे. याची माहिती या मध्ये दिली जाणार आहे. तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या गोष्टी पहायला मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या अशा पिकाचा दलाली पद्धतीला फाटा देत सरकारी नोकर वर्गाने शेतकऱ्यांनी आणलेल्या शेती मालाची खरेदी करावी .
शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमात सहभागी सर्व शेतकरी बांधव व इतरांना जेवणाची व्यवस्था करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी अध्यक्ष, वेदांत फाऊंडेशन सतीश गा. पाटील, एन. डी. मादार, ईश्वर सा. पाटील यांच्याशी सम्पर्क करावा असे आवाहन केले आहे.
—-


Recent Comments