Belagavi

झी लर्न किडझी शाळेची श्री राम मिरवणूक : जय श्री रामाच्या जयघोषाने वातावरण राममय

Share

बेळगावच्या हिंदवाडी येथील झी लर्न किडझी शाळेने , अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सर्व मुलांची भव्य मिरवणूक काढली .

हिंदवाडीच्या रस्त्यावरून ,भगवी वस्त्रे परिधान करून , श्री राम , माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्या वेशात , जय श्री राम अशा घोषणा देत सर्व बालचमूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले . निमित्त होते अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे . भगवी वस्त्रे प परिधान करून वनवासाला निघालेले राम , लक्ष्मण , सीता आणि त्यांना वनवासात साथ देणारा अन्जनी पुत्र हनुमान … आपली चिमुकली पावले टाकत जय श्री राम असा जयघोष करीत भगव्या वस्त्रातील लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती .

आपल्या भारतीय संस्कृतीला साजेशी अशी ही मिरवणूक हिंदवाडीच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली . यावेळी मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षिकांनी ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली . या मिरवणुकीने हिंदवाडी भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते .

Tags: