अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून ” पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर येथे होणार आहे .
संमेलन तीन सत्रा मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले असून सकाळी दत्त मंदिरापासून मराठा मंदिर पर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात ठरले आहे. पहिल्या सत्रामध्ये उदघाटन समारंभ तसेच अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी स्नेहभोजनानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनीही बैठकीला मार्गदर्शन केले. रणजीत चौगुले यांनी आभार मानले. या बैठकीला शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी ,संजिवनी खंडागळे, गीता घाडी, सूरज कणबरकर, स्वप्निल जोगानी, गणेश दड्डीकर, मोहन अष्टेकर, परशराम काकतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .


Recent Comments