बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे.
त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील राजदीप ट्रेडर्स दुकानासमोर
थांबविण्यात आलेल्या दुचाकी वाहनाची डिकी उघडून , आतील रोख रक्कम चोरून चोरटा दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाला आहे . चोरीचे हे दृश्य सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे
रक्कम चोरीला गेलेल्या व्यापाऱ्याने सांगितले कि , एपीएमसीमध्ये माल खरेदीसाठी पैसे घेऊन आलो होतो . दुकानासमोर गाडी लावून आत गेलो तेवढ्यात गाडीची डिकी उघडून पैसे चोरून नेले . सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाली आहे . एपीएमसी पोलिसात तक्रार दिली आहे . पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्याचा शोध घेऊन आमचे पैसे मिळवून द्यावेत अशी विनंती त्यांनी केली .
यासंबंधी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यातआली असून , पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत .


Recent Comments