जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा कर्नाटक प्रदेश कुंभार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा व खानापूर नगर पंचायत सदस्या मेघा कुंदरगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कर्नाटक प्रदेश कुंभार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा व खानापूर नगर पंचायत सदस्या मेघा कुंदरगी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा कुंभार समाजाच्या वतीने सन्मान केला. बेळगाव जिल्ह्यातील कुंभारांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना राबवून समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी निवृत्त शिक्षक शिवानंद कुंदरगी, आय. एस. कुंभार, बसवराज कुंभार, अण्णाप्पा कुंभार, शिवानंद कुंभार, निंगाप्पा कुंभार, सुरेश वैद्य, येडूर आदी उपस्थित होते.


Recent Comments