Belagavi

जीवन परत परत मिळत नाही, वाहतुकीचे नियम पाळा : आरटीओ नागेश मुंडास

Share

जीवन हे अमूल्य आहे आणि परतपरत मिळत नाही. त्यामुळे अपघातमुक्त वाहन चालविण्यासाठी प्रत्येकाने रस्त्याच्या नियमांचे पालन करून सुरक्षितपणे वाहन चालवावे असा सल्ला बेळगावचे आरटीओ नागेश मुंडास यांनी दिला.

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शासकीय अध्यापक शिक्षण महाविद्यालय व प्रादेशिक मार्ग परिवहन कार्यालयाच्या संयुक्ताश्रयाने अपघातमुक्त वाहन चालविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमात वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर म्हणाले की, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम जाणून घेतले पाहिजेत. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी अधिक काळजी घ्यावी. असे ते म्हणाले.

आरटीओ अधिकारी नागेश मुंडास म्हणाले की, अपघातमुक्त प्रवासासाठी प्रत्येकाने रस्त्याचे नियम पाळून सुरक्षितपणे वाहन चालवावे, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. जखमींना योग्य उपचार देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. आज वाहन वापरणाऱ्यांना शिक्षित व प्रशिक्षित करून जनजागृती करण्याची गरज आहे, प्रत्येकाने हेल्मेट घालावे आणि वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये.

यावेळी ज्योती गणाचारी, अपर्णा पाटील, एन. के. काळे, आदी उपस्थित होते.

Tags: