विश्वगुरू बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केल्याबद्दल राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने विजयपूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८व्या शतकातील समाजसुधारक बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नायक म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे बसवण्णांचे सर्व अनुयायी खूश झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले. त्यांनी विश्वगुरू बसवण्णांच्या सांस्कृतिक नायक झाल्याच्या शुभेच्छा देण्यासाठी घोषणाबाजी करून आनंद साजरा केला.


Recent Comments