Banglore

राममंदिर उद्घाटनासाठी सुट्टीचा अद्याप विचार नाही : मुख्यमंत्री

Share

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सोमवारी सुट्टी जाहीर करण्याचा विचार सरकारने अद्याप केलेला नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

अयोध्या राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी शेजारच्या महाराष्ट्रात सर्वसाधारण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही सुट्टी जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

याबाबत आज सीएम सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता ते कोणतेही ठोस उत्तर न देता निघून गेले. याबाबत अद्याप विचार केलेला नाही असे ते म्हणाले.  रामलल्लाचा प्रतिष्ठापना कार्यक्रम पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी आधीच जाहीर करण्यात आली आहे. पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रात केंद्रशासित प्रदेशात सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणामधील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी 16 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्याची तयारी सुरू झाली असून आजपासून मी अर्थसंकल्पीय बैठकांमध्येही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: