कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरातील शांतीसागर जैन आश्रमात तीन दिवसीय पंचकल्याण महोत्सवाला शानदार चालना देण्यात आली. यानिमित्त हत्ती-घोड्यांच्या सहभागाने इंद्र-इंद्रायणीची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आचार्य धर्मसेन आणि आचार्य शांती सेन मुनी महाराज संघ मुनींनी शेडबाळच्या तीन दिवसीय पंचकल्याण पूजा कार्यक्रमाची सुरुवात जगातील तसेच भारतातील सर्व मानवांना शांती आणि समृद्धी आणि जागतिक शांतता लाभो अशी प्रार्थना केली.

शनिवारी पहाटे हत्ती, पाच घोडे रथ व सर्व श्रावक श्रावकांसह शेडबाळ गावातील मुख्य रस्त्यांसह मुंबईतील उद्योजक सुदर्शन दुतिया दाम्पत्याला घेऊन हत्तींवर मिरवणूक काढण्यात आली. धर्मध्वज फडकावून व मंडप पूजन, पंचरंगी ध्वजारोहण करून पूजास्थळी आगमन झाले. ध्वजारोहण, जिनबिंब प्रतिष्ठापना, जिनवाणी प्रतिष्ठापना, दीप प्रज्वलन आदी धार्मिक विधी पार पडले.
मंडप पूजन पूजा यजमान सुदर्शन दुतिया, विवेक पाटील, बेळगावचे व्यापारी राजू जक्कनवर, प्रदीप कुसुनाळे, अमित चौगुले, आश्रमाचे व्यवस्थापक राजू नांदरे यांच्यासह पूजा पद्धतीतील सर्व प्रमुख सदस्यांनी सहभाग घेऊन मंडप पूजन केले.

पंचकल्याण पूजा महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य आनंद उपडे यांनी पूजा पद्धतीविषयी माहिती देताना तीन दिवसीय पंचकल्याण पूजा कार्यक्रमात मुंबईतील व्यापारी सुदर्शन दुतिया यांनी भगवान पार्श्वनाथ तीर्थंकराची 33 किलोची चांदीची मूर्ती भेट दिली असून, तिचा प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला आहे. शनिवारी सर्व औपचारिकता पार पाडून पूजेचा कार्यक्रम सुरू झाला आणि उद्या रविवारी मुलांसाठी मौजी बंधनाचा कार्यक्रम होणार आहे.
पंचकल्याण पूजेच्या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी नेमिनाथ रेगेगौडर, महेश वाडगी, अजित मिंडा मुंबई, सुदर्शन दुतिया यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. कागवाड, अथणी, रायबाग, चिक्कोडी, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी शहरांतून जैन धर्मीय पूजेसाठी दाखल झाले आहेत.
सुकुमार बन्नुरे, इन न्यूज, कागवाड.


Recent Comments