Kagawad

कागवाडमध्ये भाजपचे उद्या राज्य सरकारविरोधात आंदोलन

Share

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या गलथान कारभाराविरोधात आणि कागवाड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भाजपतर्फे उद्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, कुडची मतदारसंघाचे माजी आमदार पी राजू यांच्यासह हजारो तालुका कार्यकर्ते कागवाडच्या राणी चेन्नम्मा सर्कलमध्ये निषेध रॅलीत सहभागी होणार आहेत.

कागवाड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत, भाजप कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. याशिवाय अन्य प्रकारचा अन्याय करणाऱ्या काँग्रेस पक्षाविरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी केले आहे.

Tags: