देश शैक्षणिकदृष्ट्या संपन्न व्हायचा असेल तर प्रत्येक घरात शिक्षणाचे वारे वाहायला हवेत, असे मत माजी खासदार व बेळगाव बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी व्यक्त केले.

हुक्केरी तालुक्यातील दासरट्टी, राक्षी, शिंदीहट्टी, लेबर कॅम्प आणि गौंडवाड गावांमध्ये सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने विवेक योजनेअंतर्गत शाळा खोल्यांचे आज त्यांनी उद्घाटन केले. राक्षी गावातील शासकीय शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष विठ्ठल पाटील होते. मान्यवरांनी रिबन कापून शाळेच्या नवीन खोल्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या.
कंत्राटदार परप्पा मगदुम व एसडीएमसी सदस्यांनी रमेश कत्ती यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश कत्ती म्हणाले की, दिवंगत उमेश कत्ती यांनी सन 2022-23 मध्ये राज्य शासनाच्या विवेक योजनेंतर्गत मतदारसंघातील विविध गावांमध्ये शाळा खोल्या बांधण्याची मंजुरी घेतली होती, परिणामी आज सर्व खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शिक्षणप्रेमींनी हातभार लावून शैक्षणिकदृष्ट्या देश सशक्त बनवावा, असे ते म्हणाले.
यावेळी बेमूलचे संचालक रायप्पा डुग, बसवराज मरडी, बीईओ प्रतिभा पाटील, नागराज पाटील, विठ्ठल चंदरगी, महेश बडगावी, बाळाप्पा भीमनावर, सिद्धप्पा मगदुम, बीआरसीएस पद्मन्नावर, सीआरपी राजपूत व्हीव्ही, मुख्याध्यापक केके कामत कंत्राटदार पराप्पा मगदूम उपस्थित होते.


Recent Comments