Udupi

उडुपी चित्ररथ मिरवणुकीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी

Share

उडुपी येथे सुरु असलेल्या पर्याय महोत्सवात काढलेल्या चित्ररथ मिरवणुकीत महिला व बालकल्याण खात्याच्या तसेच उडुपी जिल्हा पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाग घेतला.

उडुपी पर्याय महोत्सव समितीच्या मानद अध्यक्षा असलेल्या महिला व बालविकास मंत्री, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण तसेच उडुपी जिल्हा पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पर्याय महोत्सवाचा भाग म्हणून काढलेल्या चित्ररथ मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी पुत्तिगे मठाधिपती श्री सुगुणेंद्र तीर्थ श्रीपाद आणि धाकटे यती श्री सुश्रींद्र तीर्थ श्रीपाद, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, आमदार यशपाल सुवर्णा, सुनील कुमार, गुरमे सुरेश शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो श्रीकृष्णाचे भक्त उपस्थित होते.

Tags: