mumbai

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईत हुतात्मा स्मारकात आंदोलन

Share

आज १७ जानेवारी हुतात्मा दिन, हुतात्मा स्मारक मुंबई येथे हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांनी ह्या चळवळीसाठी दिलेल्या बलिदानाचा महाराष्ट्राला विसर पडला असेल तर त्यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण करून देण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्र सरकारची भेट घेऊन या दडपशाहीला पायबंद घालावा, जर कर्नाटक सरकार असच आक्रमक पणे सीमाभागात कानडीकरणाचा वरवंटा फिरवत राहील आणि महाराष्ट्र काहीच न करता गप्प राहिला तर येत्या दोन-पाच वर्षात बेळगाव सह सिमाभागात मराठी भाषा इतिहासजमा होईल. म्हणून आम्ही हात जोडून विनंती करतोय महाराष्ट्र सरकारने तात्काळ देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घ्यावी आणि सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्हाला आमचे मूलभूत अधिकार देऊन माणूस म्हणून शांततेत जगू द्यावं. आणि जर हेही जमत नसेल तर महाराष्ट्रानं सिमप्रश्नाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भागोजी पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.


प्रसंगी बेळगाव वरून उपस्थित म.ए.समिती युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कनबरकर, विजय जाधव, मनोहर हुंदरे, विनायक हुलजी, सचिन दळवी, प्रवीण रेडेकर, श्रीकांत बुवा, निर्मरकर, भागोजी पाटील, किरण मोदगेकर, मोतेश बारदेशकर, वासू समजी, राजू पाटील, रामा पाटील, सिद्धप्पा तरळे तसेच मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख, द.मुंबई अध्यक्ष सचिन दाभोळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: