Khanapur

अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Share

अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना खानापूर तालुक्यातील हुलंद गावात घडली आहे. गंभीर जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

गुरे राखण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना खानापूर तालुक्यातील हुलंद गावात घडली आहे. शेतकरी विठ्ठल दुलाजी गावडे हे रविवारी दुपारी घरातून गुरे चारण्यासाठी शेताकडे गेले असता रात्र झाली तरी ते परतले नाहीत. गुरे घरी परतली पण ते परतले नसल्याने घरचे व गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी ते शेताकडे गंभीर जखमी अवस्थेत सापडले. अस्वल व त्याच्या दोन पिलानी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना घरी आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

Tags: