Chikkodi

स्वामी विवेकानंद जयंतीनिमीत्त वार्षिक स्नेहसंमेलन

Share

चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील स्वामी विवेकानंद कन्नड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

कार्यक्रमात प्रथम चालणारे देव म्हणजे लिंगैक्य श्री सिद्धेश्वर श्री, स्वामी विवेकानंद आणि विद्यादेवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कवी व कीर्तनकार ह.भ.प. सुभाष शेवाळे यांच्या दिव्य उपस्थितीत , झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अधिष्ठाता डॉ. अजित चिगरे होते . प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडी CSS शाळेचे शिक्षक तुकाराम बडाची,. शिवराज मिरजी, कुमारी श्वेता चिगरे, अनिकेत तेरदाळे , कुमारी यास्मिन मुल्ला उपस्थित होते.

 

यावेळी शाळेचे अध्यक्ष मोहन पाटोळे, उपाध्यक्ष सुरेश खोत , सचिव संजय चौघुले, ग्रा.पं. अध्यक्ष सुमन शेळके, उपाध्यक्षा वंदना कांबळे, PKPS अध्यक्ष हुवण्णा चौघुले, उपाध्यक्ष सुभाष घोशरवाडे, जय हनुमान सहकार अध्यक्ष अप्पासाहेब जत्राटे, उपाध्यक्ष अरुण पाटोळे, आनंद जाधव, (महाराजे), शाळा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बाळासाहेब घोशरवाडे, दादा उपाध्याय, रामचंद्र धनवडे, अण्णासाब डोणवडे, अण्णासाब शेडबाळे, बंडू पाटील, राजू गुरव, अमोल शेट्टी, देवप्पा इंगळे, लगमण्णा जुगळे, शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, अनेक मान्यवर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: