Belagavi

विणकर सेवा संघ करणार मुख्यमंत्र्यांचा सन्मान

Share

यंत्रमाग विणकरांना 10 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचे काँग्रेस सरकारने निवडणूकपूर्व आश्वासन पूर्ण केले असून याचा फायदा राज्यातील २५ हजार 10 एचपी यंत्रमाग धारकांना झाला आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा विणकर सेवा संघातर्फे सत्कार करण्यात येईल अशी माहिती संघाचे अध्यक्ष शिवलिंग तिरकी यांनी दिली.

बेळगावात विणकर संघटनेची खुली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी यंत्रमाग विणकरांना 10 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कर्नाटक राज्य विणकर सेवा संघातर्फे आभार मानण्यात आले.

बैठकीत बोलताना विणकर सेवा संघाचे अध्यक्ष शिवलिंग तिरकी यांनी सांगितले की, 10 एचपीपर्यंत मोफत वीज देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली असून, डिसेंबरमध्ये मिळणारे वीज बिल शून्य आहे. आम्ही सर्व विणकरांच्या वतीने राज्य काँग्रेस सरकारचे आभार मानतो, याबद्दल आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या याना सन्मानित करू असे म्हणाले.

यावेळी कर्नाटक विणकर सेवा संघाचे विविध जिल्ह्यातून आलेले सदस्य उपस्थित होते.

Tags: