Vijayapura

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या तरुणांची पोलीस चौकशी

Share

वाढदिवसाच्या दिवशी चाकूने केक कापण्याची प्रथा आहे. मात्र विजयपूर शहरातील पेट बावडी येथे एका तरुणाने तलवारीने वाढदिवसाचा केक कापल्याची घटना घडली आहे.

अमन लोणी नामक तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केले तलवारीने कापला . या तरुणाला मोहम्मद साजीद इनामदार या राऊडी शीटरने साथ दिली.तलवारीने वाढदिवसाचा केक कापल्याचे चर्चा सुरु आहे . तलवारीने केक कापण्याची परंपरा काय असा सवाल सुज्ञ लोक करत आहेत. अमन लोणी आणि राउडी शीटर यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अमन लोणी आणि राउडी शीटर यांना नोटीस बजावली आहे ,

ही घटना गोलघुमट पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

Tags: