अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानेचे दिवस जवळ येत आहेत, विविध ठिकाणांहून रामभक्तांची ये-जा सुरू आहे, त्याचप्रमाणे धारवाड हुबळी येथील तरुण आज दुचाकीवरून अयोध्येला गेले.
22 जानेवारी रोजी होणाऱ्याअयोध्येतील श्री राम प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमात सहभागी होण्याच्या उद्देशाने धारवाड हुबळी येथील चार तरुणांनी दुचाकीवरून प्रवास केला. दर्शन पवार, दर्शन भावे, बाळराज दोडमणी, लक्ष्मण हंचिनमणी हे 2000 हजारकिलो मीटरच्या बाईक प्रवासाला निघाले आहेत. .जय श्री रामाचा जयघोष करत त्यांनी जनतेचा निरोप घेतला.आणखी चार तरुणांनी चार दिवसात अयोध्येला पोहोचण्याचा बेत आखला असून त्यांनी आज धारवाड येथून प्रवासाला सुरुवात केली.या प्रसंगी जनतेसह मित्रमंडळींनी युवकांना शुभेच्छा दिल्या.


Recent Comments