Belagavi

संभाजीराजे राज्याभिषेक दिनानिमित्त समर्थनगरमध्ये मंदिरांची स्वच्छता

Share

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 343 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेळगावातील समर्थनगर येथील नागरिकांनी मंगळवारी सकाळी मंदिर व परिसराची स्वच्छता केली.

होय, देव, देश अन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 343 वा राज्याभिषेक दिन आज बेळगावात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त समर्थनगर येथील नागरिकांनी मंगळवारी सकाळी मंदिर व परिसराची स्वच्छता केली.

गणेश, मारुती, ब्रह्मलिंग मंदिर व अन्य मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्थानिक नगरसेविका नेत्रावती विनोद भागवत यांनी या मोहिमेला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्त्यांना पाण्याचे टँकर पाठवून उपक्रमात सहभाग घेतला.

Tags: