Belagavi

संगोळी रायण्णा सैनिक शाळेचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

संगोळी रायण्णा हे कर्नाटकात स्वातंत्र्याचे पहिले रणशिंग फुंकणारे महान सैनिक होते. त्यांच्या नावाने संगोळी येथे बांधलेल्या रायण्णा सैनिक शाळेचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे, असे माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी सांगितले.

माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी आज, मंगळवारी बेळगाव प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कित्तूर राणी चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा हे इंग्रजांविरुद्ध लढणारे भारतातील पहिले लढवय्ये होते. गनिमी कावा युद्धनीती वापरून रायण्णा यांनी इंग्रजांना नको नकोसे करून सोडले हा इतिहास आहे.

संगोळी या मूळगावी रायण्णा यांचे समरणार्थ 262 कोटी रु. खर्चून संगोळी रायण्णा सैनिक शाळा आणि शौर्य वन उभारण्यात आले आहे. रायण्णा सैनिक स्कूल आणि शौर्यवन यांचे येत्या बुधवारी उद्घाटन होत आहे, असे ते म्हणाले. संगोळी रायण्णा हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते. रायण्णा यांचे कार्य सर्व समाजातील तरुणांसाठी आदर्श आहे.

रायण्णा यांच्या कार्याची माहिती राज्यातील जनतेला व्हावी या हेतूने संगोळी रायण्णा यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक आमदार या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: