बेळगावातील विश्वभारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलतर्फे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
बेळगावातील एक जुनी व नामवंत शिक्षणसंस्था असलेल्या विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलच्या वतीने महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शाळेच्या शिक्षकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्केटिंगमध्ये सुवर्णपदक विजेती सई पाटील तिचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार स्वीकारून बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी राज्याची मंत्री झाले आहे. मला आमदार म्हणून निवडून देऊन तुम्ही मला संपूर्ण राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी काम करेन. यावेळी हेब्बाळकर यांनी राज्याच्या विकासाबरोबरच या क्षेत्राच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी, स्केटिंग सुवर्णपदक विजेती सई पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, अशोक कांबळे, राहुल उरणकर, रेणुका भातकांडे, अलका कित्तूर, प्रेरणा मिरजकर, गजानन काकतकर, कृष्णा पावशे आदी उपस्थित होते.


Recent Comments