चिक्कोडी मतदारसंघातून भाजपचे युवा नेते अमित कोरे यांना लोकसभेचे तिकीट देण्याची चर्चा दिवसेंदिवस वाढत असतानाच आता भाजपचे नेते अजितराव देसाई, सिदगौडा मगदूम, युवराज पाटील आणि श्रीकांत उमराणे यांनी एकत्र येत अमित कोरे यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे.

चिक्कोडी तालुक्यातील चंदूर गावात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अमित कोरे हे या चिक्कोडीच्या ,मतदारसंघात अनुभवी आहेत. त्याना अनेक भाषा माहित आहेत आणि सीमावर्ती प्रदेशाची नाडी माहित आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करणारे, शेतकरी मित्र, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक , डॉ. प्रभाकर कोरे पतसंस्थेचे संचालक, केएलईचे बोर्ड मेंबर, नॅशनल बोर्ड ऑफ शुगर फॅक्टरीजचे चेअरमन, शिवशक्ती शुगर्स, जनशक्ती फाउंडेशन चिक्कोडीचे संस्थापक, डॉ. प्रभाकर कोरे चॅरिटेबल हॉस्पिटलचे अध्यक्ष, बसव इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे . गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात खूप काही साध्य केले आहे.
सीमाभागात खासगी व सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या अमित कोरे यांनी सीमाभागातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, त्यांना यावेळी लोकसभेचे तिकीट दिल्यास मतदारसंघाची प्रतिमा बदलेल. चिक्कोडी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना तयार करण्यास आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास सक्षम आहे. आधीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना बेळगाव किंवा चिक्कोडी येथून तिकीट द्यायचे होते आणि राज्यसभेचे तिकीट देण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा त्यांनी विनम्रपणे नाकारली असतानाही डॉ . प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ते अत्यंत हुशार आहेत. राज्यसभेपेक्षा लोकसभेत काम करण्यास ते अधिक सक्षम असून, चिक्कोडी लोकसभेचे तिकीट भाजप पक्षाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी सीबीकेएसएस कारखान्याचे संचालक अजितराव देसाई,, डॉ. प्रभाकर कोरे बँकेचे उपाध्यक्ष सिदगौडा मगदूम, सीबीकेएसएस कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत उमराणे, युवराज पाटील, डॉ. सुकुमार चौघुले, अशोक मगदूम, बाळकृष्ण पाटील, अभिजीत पाटील, संजय पाटील, भगवान मड्डेप्पगोळ, सचिन बेलवी, दिलीप पाटील, नायकुबा माने, पुरंदर कोळी, अशोक जमदाडे, प्रमोद मड्डेप्पगोळ, प्रकाश दड्डे. अण्णासाब माने, गिरमल्ल अम्मनगी, राहुल देसाई, संजय चव्हाण, अरविंद राठोळी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.


Recent Comments