Belagavi

सीमाभातील मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र सरकारकडून मिळवून देणार मदत :चंदगडचे आ . राजेश पाटील

Share

बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकरणी देवीच्या प्रांगणात , आज साहित्याचा जागर झाला . अनेक नामवंत कवी , साहित्यिकांनी या उचगाव नगरीतील साहित्य संमेलनात आपल्या ओघवत्या शैलीत विचार मंथन केले .

उचगाव येथील येथील मळेकरणी देवीच्या प्रांगणात आज २२ वे साहित्य संमेलन पार पडले . या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गावात ग्रंथदिंडी काढण्यात आली . उपस्थित मान्यवरांनी ग्रंथ पालखीचे पूजन केले . वारकरी मंडळे , भजनी मंडळे , विविध वेशभूषा केलेली मुले , नटून सजून फेटे बांधून महिला या ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या होत्या . गावातील प्रमुख मार्गवरुन ही ग्रंथदिंडी काढण्या आली .

त्यानंतर चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनी संमेलनाचे उदघाटन केले . यावेळी बोलताना ते म्हणाले कि ,मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि प्रसार मराठी साहित्य संमेलनातून केला जात आहे . प्रत्येकाला आपल्या जातीचा , धर्माचा अभिमान असतो तास आपल्या भाषेचा अभिमान , असणे ही काळाची गरज आहे . भाषेचे जतन करणे तसेच विस्तार होण्यासाठी अशी साहित्य संमेलने भरवली जातात . नवीन तरुण पिढीने , चांगले विचार त्याचे अनुकरण करण्यासाठी , अशी संमेलने गरजेची आहेत . या भागाची गरज ओळखून शिवाजी विद्यापीताचे उपकेंद्र शिनोळी सारख्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुरु केले आहे . त्याचा लाभ बेळगाव तसेच खानापुरातील विध्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . मराठी साहित्य संमेलनासाठी , महाराष्ट्र सरकारकडून साह्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .

संमेलनाध्यक्ष लक्ष्मणराव महाडिक यांनी सांगितले कि, मराठी मातीची जी सुपीकता आहे ती संतांच्या पाऊलवाटेने ,संतांच्या अभंगांमुळे , संतांच्या अक्षरवाङ्मयामुळे निर्माण झाली आहे . भाषा म्हणजे श्वास असतो . माणसाने बुद्धीच्या बळावर भाषेचा शोध लावला . नुसती भाषा निर्माण न करता ,मी बोलिला व्यंजनात्मक स्वरूप दिले . लिखित स्वरूपात भाषा आणली . भाषेतून सर्व काही व्यक्त करता येते .

संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवी संमेलन , तसेच चौथ्या सत्रात बंडा जोशी यांचा विनोदी हास्यपंचमी कार्यक्रम पार पडला . या संमेलनात आय आय पाटील , मालोजी अष्टेकर , एम जी पाटील , बसावन्त मायाण्णाचे , मोहन बेळगुंदकर , बी एस होनगेकर , अप्पासाहेब गुरव , जोतिबा आमरोळकर शिवाजीराव अतिवाडकर , तानाजी गडकरी , आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते

Tags:

UCHAGAON MARATHI SAHITYA SAMMELAN