belgaum north

रोटरी अन्नोत्सवात संजना देसाई ठरल्या सुपर वुमन किताबाच्या मानकरी

Share

बेळगावच्या सीपीएड मैदानावर सुरु असलेल्या रोटरी क्लब आयोजित अन्नोत्सवात आयोजित केलेल्या ” सुपर वुमन ” चा ‘किताब संजना देसाई यांनी पटकावला तर शिल्पा कुलकर्णी फर्स्ट रनर अप आणि तृप्ती मांगले यांनी सेकंड रनर अपचा मान मिळवला .

रोटरी क्लब ऑफ बेळगाव कडून , आयोजित अन्नोत्सव २०२४ मध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत . शनिवारी , खास बेलगाच्या महिलांसाठी सुपर वुमन स्पर्धा अगदी चुरशीने पार पडली . या स्पर्धेत सर्व बाबतीतही वरचढ ठरून , संजना देसाई यांनी सुपर वुमनचा ‘किताब पटकावला . गेल्यावर्षीच्या विजेत्या अमृता रायबागी यांच्या हस्ते यंदाच्या विजेत्या संजना देसाई याना सुपर वुमनचा मुकुट चढवण्यात आला . यावेळी २०२० मध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया कर्नाटकाच्या पहिल्या पाच स्पर्धकांमधील बेळगावच्या रती हुलजीं उपस्थित होत्या . त्याचप्रमाणे उपविजेत्या शिल्पा कुलकर्णी आणि तृप्ती मांगले याना देखील सन्मानित करण्यात आले . यायला बेस्ट स्माईलचे बक्षीस अर्चना पद्मन्नावर याना देण्यात आले .

 

यावेळी इन न्यूजशी “सुपर वुमन ” संजना देसाई यांनी , आनंद व्यक्त केला . महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि तुम्ही जे कराल ते आत्मविश्वासाने करा असा संदेश त्यांनी महिलांना दिला .

फर्स्ट रनर अप ठरलेल्या शिल्पा कुलकर्णी यांनी आपण खूप आनंदित असल्याचे सांगितले , तुम्ही जे कराल ते मेहनतीने करा. आणि ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा . याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल .

बेळगावच्या महिलांसाठ आयोजित केलेल्या या इव्हेंट बद्दल सेकंड रनर अप तृप्ती मांगले यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे आभार मानले . त्यांनी आपल्या यशाबद्दल खूप आनंद झाल्याचे सांगितले .

रोटरी अन्नोत्सवाचे चेअरमन डॉ . संतोष पाटील यांनी , रोटरी अन्नोत्सवाला बेळगावकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले . आज मिसेस बेळगावी सुपर वुमन कार्यक्रम झाला . दोन वर्षांपासून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करीत लाहोटी . या स्पर्धेत झालेल्या पहिल्या दोन फेऱ्यांमधून , २४ महिलांची अंतिम फेरीसाठी निवड करण्या आली . यातून तीन जणींची अंतिम निवड करण्यात आली . परीक्षक म्हणून भाग्यश्री कामात , केतकी पाटील तसेच मिस कर्नाटक राती हुलजीं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .

रोटरी अन्नोत्सवाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धण्णावर यांनी आभार मानले . अन्नोत्सवातील सर्व स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळाला . यापुढेही असाच पाठिंबा द्यावा असे आवाहन केले . अन्नोत्सवात मनोरंजनाचे कार्यक्रम देखील उत्तम रित्या पार पडले . अन्नोत्सवातून मिळणार फायदा आम्ही बेळगावच्या जनतेच्या भल्यासाठी वापरणार आहोत . बेळगावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगितले .

या कार्यक्रमात रोटरीचे सुनीश मित्रांनी , मनोज मायकल , अविनाश पोतदार आणि रोटरीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

Tags:

annotsav fashion fimina mrs India womwn world