बेळगावातील सीपीएडी मैदानावर रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या सहयोगाने बेळगाव रस्ता सुरक्षा सप्ताह-2024 पार पडला. यानिमित्त रांगोळी स्पर्धा व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बक्षिसादाखल वेगा हेल्मेट कंपनीच्या हेल्मेटचे वाटप बेळगावचे पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन.सिद्धरामप्पा म्हणाले की, रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आपण ज्या विशेष बाबी पाळणे आवश्यक आहे ते म्हणजे रहदारीचे नियम. गेले काही दिवस रस्त्यावर मोठे अपघात होताना दिसत आहेत आणि याची जाणीव आपल्याला झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. पोलीस विभाग सदैव तुमच्या पाठीशी असेल.

बेळगाव गुन्हे व वाहतूक पोलीस उपायुक्त स्नेहा व रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धन्नावर, मनोज मायकल, संतोष पाटील सुनील मैत्राणी तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.


Recent Comments