बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात राष्ट्रीय पक्षी मोरांना विषारी दाणे घालून त्यांची हत्या केल्याची घटना घडली.

मोराच्या मांसासाठी मोरांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याचा आरोप आहे . मांसासाठी मोरांची हत्या करण्यात आली आहे . . कृष्णा नदीच्या पलीकडे दुचाकी उभी करून मोरांना मारण्यासाठी आलेल्या बदमाशांचा मांजरी ग्रामस्थांनी पाठलाग केला असता त्यांनी कृष्णा नदीत उडी मारून पोहत पळ काढला.
मांजरी ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली . अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोरांना शवविच्छेदनासाठी पाठवले. आरएफओ प्रशांत गौरानी यांच्याविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला. याआधी मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती देऊन देखील , वन अधिकाऱ्यानी कोणतीही खबरदारी न घेता बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


Recent Comments