विजयपूर जिल्ह्यातील एका झोपडीला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे .
इंडी तालुक्यातील लिंगदल्ली गावात हा प्रकार घडला. यांच्या सिद्धप्पा वालीकार यांच्या झोपडीला आग लागली . देव्हाऱ्यात लावला दिवा चुकूनखाली पडला आणि आगीची दुर्घटना घडली. झोपडीतील पाच लाख रुपयांची रक्कम, दोन तोळे सोने, एक पोती मिरची, मौल्यवान सोन्याचे दागिने व इतर कागदपत्रांचे नुकसान झाले.
ही घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments