Dharwad

पेढानगरी धारवाडमध्ये बनला 15 इंचाचा ‘रामलल्ला’

Share

अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या बाल रूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर धारवाडमधील एका तरुणाने मातीची 15 इंचाची ‘रामलल्ला’ची मूर्ती बनवली आहे.

गायत्रीपुरम, केळगेरी, धारवाड येथील रहिवासी असलेले पर्यावरणप्रेमी कलाकार मंजुनाथ हिरेमठ यांचा मुलगा विनायक याने केवळ 15 इंच मातीची ‘रामलल्ला’ची मूर्ती तयार केली आहे. देशातील तीन नामवंत शिल्पकारांना रामाची मूर्ती तयार करताना पाहून प्रेरित झालेल्या विनायकने 15 इंची रामाची मूर्ती तयार केली. विशेष म्हणजे या मूर्तीमागे मंत्रमुग्ध करणारी प्रभावळ आणि सूर्याची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. एकूणच ही रामाची मूर्ती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: