Dharwad

कर्जबाजारी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Share

धारवाड येथील राजनगर येथे महिला बचत संस्थेचे कर्ज घेतलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सुंदरव्वा गम्बेर असे महिलेचे नाव असून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुंदरव्वा यांनी बचत संस्थेत केलेल्या कर्जामुळे ती अडचणीत आली असून तिच्याकडून पैसे घेतलेल्या व्यक्तीने ते परत केले नसल्याचा उल्लेख डेथ नोटमध्ये आहे.

इतकेच नाही तर मृत्यूनंतर मृतदेह रुग्णालयात द्या, अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत, असेही तिने सांगितले. ही घटना धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली आहे

Tags: