येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून बेळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे भाजप नेते माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
बेळगावात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले की, २०२२ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून मी विधान परिषद निवडणूक लढवली होती. पण काही कारणांमुळे आपला पराभव झाला. यंदा लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक आहोत. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची सर्व तयारी केली आहे, असे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.


Recent Comments