Banglore

लाल बहादूर शास्त्री यांना सिद्दरामय्यांनी वाहिली आदरांजली

Share

रेल्वेची दुर्घटना घडली तेव्हा राजीनामा देऊन सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च पद लाल बहादूर शास्त्री यांनी सोडले होते. ते एक अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते अशा शब्दांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शास्त्रीजींना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज विधानसौध परिसरात माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, शास्त्रीजी हे जवाहरलाल नेहरूंनंतर देशाचे दुसरे पंतप्रधान होते. देशाच्या हितासाठी त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला. लाल बहादूर शास्त्री यांनी संपूर्ण देशातील जनतेला अन्नधान्यात स्वयंपूर्णता प्राप्त होत नसताना एका दिवसाचे उपोषण करण्याचे आवाहन केले होते. ते अल्प कालावधीसाठी पंतप्रधान असतानाही त्यांनी अन्नोत्पादनात स्वयंपूर्णता साधण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा रेल्वे आपत्ती घडली तेंव्हा राजीनामा देऊन लाल बहादूर शास्त्रींनी सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च पिढी सोडले होते.

पाकिस्तानविरुद्धचे युद्ध त्यांच्यामुळे देशाने जिंकले. ते अत्यंत प्रामाणिक राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांची पुण्यतिथी देशभर साजरी केली जाते, असे ते म्हणाले.

Tags: