चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखवले.

जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या सहकार्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी पुराच्या वेळी लोकांचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले . . कल्लोळ गावाच्या मधोमध अडकलेल्या लोकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले व येडूर गावातील नदीकाठावर नेऊन त्यांची सुटका करण्यात आली.या पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना निवारा केंद्रात पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे , पुरात अडकलेल्या जनावरांना वाचवून , पशुवैद्याधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली .
पुरात अडकलेल्या आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करणे आणि उपचार करणे, यासह पूर व्यवस्थापन
असे अनेक प्रकारचे प्रात्यक्षिक होते:
याच प्रसंगी प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभम शुक्ला यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील अतिवृष्टीदरम्यान चिक्कोडी उपविभागातील नागरिकांचे संरक्षण कसे करता येईल, यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले. पुढे डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा यांनी सांगितले की, पूर आल्यावर नदीच्या मध्यभागी अडकलेल्या कल्लोळा येथील ग्रामस्थांना वाचवण्यासाठी हे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी, सीपीआय विश्वनाथ चौगला, एडीएचओ एस एस गडाद , टीएचओ सुरेश भागई, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सदाशिव उप्पार, आरोग्य विभाग, महसूल विभाग, अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments