Belagavi

किंग कोब्राने माजवली काकती पोलिसात दहशत

Share

सहसा पोलिस म्हटले की सगळेच घाबरतात, आणि पोलीस मात्र कोणालाही घाबरत नाहीत अशीच धारणा समाजात आहे. मात्र बेळगावजवळील काकती पोलीस मात्र एका वेगळ्याच कारणामुळे सध्या जाम घाबरले आहेत.

होय, वेळी-यावेळी काकती पोलीस स्थानकात हजर होणाऱ्या नागराजाला काकती पोलीस जाम घाबरले आहेत. सापाच्या भीतीखालीच ते स्थानकात काम करत आहेत. विशेष म्हणजे, सर्पतज्ञांनाही हे साप दाद देईनात. काकती पोलीस ठाण्यात साप पकडण्यासाठी आलेल्या सर्पतज्ज्ञाला सापांनी चावा घेतला आहे. गेल्या सहा महिन्यात ते अनेकवेळा हजर झाले आहेत. साप समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, सापांची शांती आणि पूजा करण्यासाठी त्यांनी काकती पोलीस ठाण्यात हजेरी लावली. मात्र त्याचा उपयोग झालेला नाही. विशेष म्हणजे मांसाहार करून कोणी पोलीस स्थानकात आला की, किंग कोब्राचे दर्शन होत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी मांसाहाराला निरोप दिला आहे.

इन न्यूज चॅनलशी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकणारे कोणी नाहीत, जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे, त्यामुळे आम्हाला नकोसे झाले आहे. या ठिकाणची सापांची वारुळे उद्ध्वस्त करून त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधले, पण त्यामुळेच सापांचे वैर सुरु झाले असावे.

एकंदर, किंग कोब्राने काकती पोलिसांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे. सापांच्या भीतीने तेथील पोलिसांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. या आगळ्यावेगळ्या त्रासातून त्यांची कधी सुटका होणार हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

Tags: