Belagavi

वकील संघटना, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून व्याख्यान

Share

विधिमंडळ आणि कार्यांग यातील त्रुटी दूर करण्याचे काम वकील करू शकतात. त्यांनी या दिशेने स्वत:ला झोकून देऊमी काम केले पाहिजे असे आवाहन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एस. पाश्चापुरे यांनी केले.

बेळगाव बार असोसिएशन, बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ब्रह्माकुमारी ईश्‍वरिय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “कायदेशीर व्यवसायातील मूल्ये आणि नैतिकता आणि तणाव व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. वकील समुदाय भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुढे बोलताना निवृत्त न्यायमूर्ती ए.एस. पाश्चापुरे म्हणाले की, वकिलांनी लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी विविध कायदेशीर नियमांतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनात त्रुटी आढळल्यास सुधारात्मक कार्यवाही करावी. वकिलांचे काम हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात ए.एस. पाश्चपुरे, जिल्हा न्यायाधीश विजयालक्ष्मी, ब्रह्मा कुमारी विद्यापीठाचे सदस्य व बेळगाव बार असोसिएशनचे सचिव सचिन आर शिवण्णावर व सदस्य सहभागी झाले होते.

Tags: