आगामी लोकसभा निवडणुकीत चिक्कोडी मतदारसंघातून युवा नेते अमित कोरे यांना भाजप पक्षाचे तिकीट द्यावे, अशी मागणी भाजपचे नेते सुरेश पाटील व भरतेश बनवणे यांनी केली आहे.

चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली. अमित कोरे यांना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाची चांगली माहिती असून, ते अनुभवी आहेत. त्यांना अनेक भाषा येतात आणि सीमावर्ती प्रदेशाची नाडी माहित आहे. चिक्कोडी येथील चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष व विद्यमान सभासद आणि रायबाग तालुक्यातील यड्राव येथील शिवशक्ती साखर कारखान्याचे प्रभारी म्हणून राजकीय व सामाजिक अनुभव असलेले तरुण नेते आहेत.
चिक्कोडी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना तयार करण्यास आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास ते सक्षम आहेत. डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली ते तयार झाले आहेत. या आधीच त्यांना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बेळगाव किंवा चिक्कोडीमधून तिकीट किंवा राज्यसभेचे तिकीट देण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा अमित कोरे यांनी नम्रपणे नाकारली. त्यांनी राज्यसभेपेक्षा लोकसभेत कामकाज करावे यासाठी, चिक्कोडी लोकसभेचे तिकीट भाजपने द्यावे, अशी मागणी माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश पाटील यांनी केली आहे.
त्याचबरोबर चिक्कोडी जिल्ह्याची मागणी व अंकली तालुका केंद्राच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अंकली हे सुरुवातीपासूनच या भागातील व्यापारी केंद्र आहे, आता तालुका केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे, असे चिदानंद कोरे साखर कारखान्याचे सदस्य भरतेश बनवणे यांनी सांगितले.
यावेळी सीबीकेएसएस कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक भरतेश बनवणे, अण्णासाबा पाटील, डॉ. प्रभाकर कोरे बँकेचे अध्यक्ष महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिदगौडा मगदूम, संचालक प्रफुल्ल शेट्टी, प्रसाद मेदर, विवेक कामटे, अंकली ग्रा.पं. माजी अध्यक्ष सुरेश पाटील, कोरे बँकेचे महाव्यवस्थापक डी.एस. करोशी, नागेश धरणाईक, पिंटू हिरेकुरुबर आदी उपस्थित होते.


Recent Comments