हुक्केरी नगर येथील टिपू सुलतान कॉलेजजवळील हजरत मीर सय्यद दाहूद कलामिया दर्ग्याच्या , दादा कलामिया यांच्या ३३२ व्या जयंतीनिमित्त उरुस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

बेळगाव जिल्हा मुस्लिम कल्याण व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इक्बाल अहमद अब्दुल गफार पीरजादे व मौलाना व नेत्यांनी गलीफ अर्पण करून उरुसाची सुरुवात केली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना इकबाल पीरजादे म्हणाले कि , दादा कलामी यांची ३३२ वी जयंती आज हुक्केरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
नंतर कार्यक्रमात एम के मौलवी यांनी इक्बाल अहमद पीरजादे यांचा सत्कार केला. शेवटी मौलाना यांनी संतांच्या शिकवणीवर प्रवचन दिले.
यावेळी गौस कादरी पीरजादे, शहीद पीरजादे, मौलाना सय्यद कुतुबुद्दीन, मौलाना अंजार, मौलाना नसीम, मौलाना इरफान राजा, नजीर पीरजादे, एम के मौलवी, राजू इंगोली, इर्शाद मोकाशी आदी उपस्थित होते.


Recent Comments