Dharwad

राज्य सरकारची तालिबानी राजवटीशी तुलना केल्याने काँग्रेस आक्रमक

Share

सिद्धरामय्या यांच्या सरकारची आयएसआयएस-राजवटीशी तुलना केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात मंत्री संतोष लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी धारवाडमध्ये आंदोलन केले.

सिद्धरामय्या यांच्या सरकारची तालिबान-आयएसआयएसशी तुलना करणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात धारवाड जिल्ह्याचे पालक मंत्री संतोष लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या राजीनामा मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना सादर केले.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका करताना मंत्री संतोष लाड यांनी, जोशी यांच्या विरोधात आजपासून निदर्शने करण्यात येणार आहेत. धारवाड मतदारसंघ हा विचारवंत आणि पुरोगाम्यांचा मतदारसंघ आहे. जोशी अशा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. जोशी यांच्याबद्दल मला व्यक्तिशः आदर आहे. मात्र, त्यांनी सिद्धरामय्या यांच्या सरकारची तुलना तालिबान आणि इसिसच्या राजवटीशी केली, हा धारवाडच्या जनतेचा अनादर आहे. लोकशाही व्यवस्थेत टीका करता येते. मात्र, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या प्रशासनाची तुलना आणि टीका करणे योग्य नाही. त्यांनी तत्काळ आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी लाड यांनी केली.

 

Tags: