Belagavi

आंबेडकर शक्ती संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Share

मागासवर्गीय कल्याण विभागाच्या जिल्हा अधिकारी शिवप्रिया कडचूर यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.

यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण कोलकार म्हणाले की, सुळगा गावातील इंदिरा गांधी दलित विध्यार्थी निवासी शाळा आणि तेथील वसतिगृहातील अव्यवस्था व आरोग्याच्या दुरवस्थेविरोधात आम्ही 3/2024 रोजी आंदोलन केले होते. त्यांनी दलित नेत्यांचा अपमान केला आहे. आम्ही दलित नेते असून त्यांनी लढवय्यांचा अपमान केला आहे. मागासवर्गीय कल्याण विभागाच्या जिल्हा अधिकारी शिवप्रिया कडचुरु यांची येथून बदली करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने आम्ही उपोषणास बसलो आहोत.

यावेळी संघाचे एसटी विभागाचे जिल्हाध्यक्ष भरमा कुरली, प्रदेश उपाध्यक्ष सागर कोलकार, अशोक दुरली, मल्लाप्पा, नागेश कोलकार, किरण कांबळे, भीमसेन यांच्यासह डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे सदस्य व दलित नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: