Belagavi

सौभाग्य साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराची सीओडी चौकशी करा : महांतेश कडाडी

Share

गोकाक तालुक्यातील सौभाग्य लक्ष्मी साखर कारखाना अनेक गैरव्यवहारांमुळे अडचणीत आला आहे. सरकारने त्याची सीओडीकरवी चौकशी करावी, अशी मागणी गोकाकचे काँग्रेस नेते डॉ. महांतेश कडाडी यांनी केली आहे.

बेळगावात आज मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना गोकाकचे काँग्रेस नेते डॉ. महांतेश कडाडी यांनी सांगितले की, रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात विविपुरम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, सौभाग्य लक्ष्मी साखर कारखान्याचे मालक आमदार रमेश जारकीहोळी यांनी निवडणुकीपूर्वी कारखाना दिवाळखोर घोषित केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी साखर कारखान्याशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र आता रमेश जारकीहोळी, आंबीराव पाटील या तिघांवर मिळून कलम 420 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कर्ज देताना जो अध्यक्ष होता तो कर्जफेड होईपर्यंत अध्यक्ष राहतो. इथं कर्ज मिळाल्यानंतर घरी बसून काम करणाऱ्यांना संचालक बनवले आहे. याप्रकरणी आता बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौभाग्य लक्ष्मी साखर कारखाना भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

रमेश जारकीहोळी यांनी 2010 मध्ये हा कारखाना सुरू केला. साखर कारखान्याला जमीन देण्यास तत्कालीन प्रांताधिकाऱ्यानी विरोध केला होता. मात्र येथे गोकाक तहसीलदारांनी एन.ए. करून दिला. त्यात आठ व्यवसाय संघानी गुंतवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले. हे व्यवसाय संघ गोकाकमध्ये नाहीत. त्यांनी आपला काळा पैसा व्यवसाय संघाच्या नावावर गुंतवला आहे. 2011 ते 2016 पर्यंत आठ वेळा आयडीबीआय बँकेकडून 201 कोटी आणि 2014 मध्ये एसबीआय बँकेकडून 129 कोटी कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याने विजयपूर, तुमकूर, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात शिखर बँकेकडून 232 कोटी कर्ज घेतले आहे. आता अपेक्षक्स बँकेचे मुद्दल व व्याज मिळून 438 कोटी रुपयांवर गेले आहे. येथे केवळ साडेतीन हजार टन उसाचे गाळप झाले आहे. येथील व्यवसायावर नजर टाकली तर पैसे इतरत्र वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

डिस्टीलरी सुरु करू असे सांगून कर्ज घेतले, मात्र ते कारखान्यात केले नाही. हे सर्व असूनही आयएफसीआय बँकेने 2017 मध्ये नऊ कोटी कर्ज दिले आहे. त्यांना कोटींचे कर्ज कशाच्या आधारे दिले”, कारखान्याची किंमत 500 कोटी असताना त्यांनी 600 कोटींचे कर्ज कसे काय घेतले. आता व्याज अधिक मुद्दल एक हजार कोटीवर गेले आहे. सरकारने या एकूणच प्रकरणाचा तपास सीओडीकडे सोपवून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

रमेश जारकीहोळी हे एक प्रभावशाली राजकारणी आहेत, मोदींनी पंजाब प्रचारात जारकीहोळी यांच्यावर 200 कोटींचा आरोप केला होता. पण नंतर त्यांच्याशी हातमिळवणी केली, आम्ही जे अन्यायाविरुद्ध लढत आहोत, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी कडाडी यांनी केली. ऍड. चंदन गुड्डनवर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना रमेश जारकीहोळी यांना गोकाक साहुकार म्हणू नका. ते गोकाकच्या जनतेचे दुखणे आहे. त्यांना रमेश साहुकार किंवा जारकीहोळी साहुकार म्हणा, असे ते म्हणाले.

यावेळी ऍड. चंदन गुड्डनवर व इतर उपस्थित होते.

Tags: