Belagavi

आंतरशालेय, आंतर महाविद्यालयीन मुला-मुलींच्या हॉकी स्पर्धेचे उदघाटन

Share

हॉकी बेळगाव’ या संस्थेकडून बेळगावात सुभाषचंद्र बोस मैदानावर आयोजित आंतरशालेय-महाविद्यालयीन हॉकी स्पर्धांचे उदघाटन नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते करण्यात आले.

बेळगावात हॉकी कर्नाटक आणि हॉकी इंडियाच्या मान्यतेने हॉकी बेळगावकडून 8 ते 12 जानेवारी दरम्यान आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

स्पर्धेच्या शुभारंभानंतर बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी खेळ आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी आरोग्य आणि स्वच्छता आणि फिटनेससाठी खेळाडूंनी कोणता आहार घ्यावा याविषयी सांगितले. पुढील दिवसांत त्यांना आरोग्याविषयी आणि कोणता सकस आहार घ्यायचा याची माहिती देऊन सूचना दिल्या.

यावेळी बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष घुलप्पा बी होसमनी, हॉकी बेळगावचे अध्यक्ष विनोद पुंडलीक पाटील, सरचिटणीस सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, राजेंद्र पाटील, शंकरगौडा पाटील,प्रभाग 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, नीलकंठ मास्तमर्डी आदी उपस्थित होते.

Tags: