Banglore

आ. रमेश जारकीहोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Share

माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात बेंगळुरूमधील व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आ . रमेश जारकीहोळी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . . चामराजपेट येथील कर्नाटक राज्य सहकारी एपेक्स बँकेचे व्यवस्थापक राजन्ना यांनी व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह पाच जणांविरुद्ध बंगळुरूच्या व्ही व्ही पुरम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
चामराजपेठेतील स्टेट को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँकेतून 439 कोटी 7 लाख रुपयांचे कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकाक येथील सौभाग्यलक्ष्मी शुगर्स लिमिटेड कंपनीच्या नावावर 2013 ते 2017 या कालावधीत 232 कोटी 88 लाख रुपये मिळाले असून 2023 पर्यंत एकूण 439 कोटी 7 लाख रुपये थकबाकी असल्याचा आरोप राजण्णा नावाच्या बँक व्यवस्थापकाने दाखल केला आहे.
या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी, वसंत पाटील, शंकर पावडे आणि दोन अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Tags: