Belagavi

बेळगावच्या शास्त्रीनगर ये भव्य हनुमान चालीसा ग्रंथाची मिरवणूक

Share

बेळगावच्या शास्त्रीनगर येथे , हनुमान चालीसा भव्य शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली . दिमाखात पार पडली. गुजरात मधून आलेल्या महान स्वामींनी या मिरवुणकीत सहभागी होऊन , मिरवणुकीची शोभा वाढवली .

22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.देश-विदेशातील राम भक्त रामाच्या जप ,तप , होम हवन , मंत्राचा जप करत आहेत.बेळगावच्या शास्त्रीनगरमध्ये हनुमान चालीसाचा नऊ दिवस जप करण्यात आला.आज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पटेल समाज आणि विश्व हिंदू परिषद. यांच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या मिरवणुकीत श्री रामानामाचा जप करण्यात आला . यावेळी उपमहापौर रेशमा पाटील तसेच माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी , हनुमान चालीसा ग्रंथ डोक्यावर घेऊन रामनाम जप केला . शास्त्रीनगरात गुजरातमधून आलेले स्वामीजी रथावर विराजमान झाले होते आणि जणू ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतरले होते.

यावेळी माजी मंत्री के.एस.ईश्वरप्पा म्हणाले की, संपूर्ण जगात भगवान श्री रामाचे नाव घेणार नाही अशी एकही व्यक्ती नाही . सर्वजण रामानामाचा जप करीत आहेत.आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बेळगाव पटेल समाज आणि विश्व हिंदू परिषद यांनी आयोजित केलेल्या या शोभायात्रेत मी सहभागी झालो.२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होणार आहे.देश-विदेशातील रामभक्त रामनामाचा जयघोष करत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होवो, जगात शांतता नांदू दे.

22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ जेठाभाई पटेल यांनी सांगितले.त्याचाच एक भाग म्हणून आज बेळगावात भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.जेठाभाई पटेल यांनी सांगितले की, गुजराथ मधून आलेले महापुरुष रथात विराजमान झाले आहेत . .आम्ही खूप आनंदी आहोत.

विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णा भट म्हणाले की, प्रत्येक हिंदूच्या स्वप्नातील भव्य राममंदिराचे उद्घाटन 22 तारखेला होणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून पटेल समाजाने 9 दिवस रामाचा जप करून हनुमान चालीसाचा जप केला आहे. या अद्भुत कार्याला विश्व हिंदू परिषद पूर्ण पाठिंबा देईल. २० जानेवारीला बेळगाव येथील सरदार मैदानावर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. हजारो लोक सहभागी होणार आहेत, हिंदू समाजातील सर्व नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.

या भव्य मिरवणुकीत शहरातील नेते, महिला, युवक-युवती भगवा फेटा परिधान करून उत्साहाने सहभागी झाले होते.

Tags: