अन्नोत्सवामुळे देशभरातील खाद्यपदार्थ नागरिकांना एकाच ठिकाणी चाखता येतात त्यामुळे असे महोत्सव प्रत्येक शहरात झाले पाहिजे असे , सांगून मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी रोटरी परिवाराला शुभेच्छा दिल्या .
शनिवारी बहुप्रतीक्षित अशा बेळगावमधील रोटरी अन्नोत्सव २०२३ चे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते . यावेळी ब्रिगेडियर जॉयदीप यांनी रोटरी परिवाराला शुभेछया दिल्या . आपण ३८ वर्षांपासून रोटरी व रोट्रॅक्टच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . तसेच अन्नोत्सवात देशभरातील विविध खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी खवय्यांना चाखायला मिळतात . त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असते . त्यामुळे असे अन्नोत्सव प्रत्येक शहरात व्हायला पाहिजे असे ते म्हणाले .
रोटरी अन्नोत्सवाला खवय्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला . या अन्नोत्सवात कर्नाटकासह काश्मीर , हरियाणा , पंजाब , मध्यप्रदेश तसेच अन्य प्रांतांच्या रुचकर , स्वादिष्ट असा वैविध्यपूर्ण पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत . २७ वर्षांपासून , बेळगावमध्ये रोटरी अन्नोत्सव आयोजित केला जात आहे . दरवर्षी अन्नोत्सवात नाविन्यता आणली जात आहे . यावर्षी १८५ स्टॉल्स असून, ९० गृहोपयोगी साहित्य तर ९५ खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत . त्याचबरोबर ,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क , सुरु करण्यात आले आहे . ऑटोमोबाईल , गृहोपयोगी वस्तू , विमा , हॉस्पिटल असे अनेक स्टॉल अन्नोत्सवात आहेत .
रोटरी अन्नोत्सवच्या उदघाटनावेळी , रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धण्णावर , इव्हेन्टर मॅनेजर डॉ . संतोष पाटील , मनोज मायकल , तुषार पाटील , रेणू कुलकर्णी , सुनीश मित्रांनी , आदी उपस्थित होते . पहिल्याच दिवशी अन्नोत्सवाला खवय्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला . त्यांनी आपल्या आवडीच्या पदार्थांवर अगदी मनापासून ताव मारला .


Recent Comments