Hukkeri

पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या इंदिरा कॅंटीनचे अद्याप नाही उदघाटन

Share

हुक्केरी शहरात पाच वर्षांपूर्वी इंदिरा कॅन्टीनची इमारत उभी राहिली असून अद्याप तिचे उद्घाटनही झाले नाही.

पाच वर्षांपूर्वी हुक्केरी शहरातील न्यायालय सर्कलजवळ काँग्रेस सरकारने २५ लाख रुपये अनुदानातून इमारत बांधून फर्निचरची व्यवस्था केली.
सतीश जारकीहोळी यांच्या स्वतःच्या तालुक्यातील इंदिरा कॅन्टीन प्रकल्प या शीर्षकाखाली वार्तांकन करून विद्यमान काँग्रेस सरकार व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे लक्ष वेधून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी या उद्घाटनासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कँटीनची आज निविदा प्रक्रिया पूर्ण केली.

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक युनिटच्या अध्यक्ष शानुल तहसीलदार यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, 2015 मध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुक्केरी शहरात गरिबांच्या पोटापाण्यासाठी , इंदिरा कॅंटीनची इमारत बांधली होती, मात्र त्याची सुरुवात राजकीय कारस्थानातून झाली नाही तर आता जिल्हा पालकमंत्री गरिबांचे पोट भरण्याची योजना प्रत्यक्षात आणावी म्हणून आज आपल्या सरकारचे मंत्री इंदिरा कॅंटीनचे लोकार्पण करत आहेत.

याठिकाणी तालुका कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील उपाशीपोटी लोकांना अल्प दरात अन्न मिळेल. मजूर, आॅटो चालक व इतरांना अल्पदरात नाश्ता व जेवण मिळेल, अशी जनतेची आशा आहे.

Tags: