बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील भात, गवत गंज्यांना आग लावण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
होय,शेतात रचलेल्या कापणी केलेल्या भाताच्या आणि गवताच्या गंज्यांना आग लावण्याचे दुष्कृत्य काही समाजकंटक करत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
नुकतेच येळ्ळूर, मच्छे शिवारात शेतातील अनेक गवत, भात गंज्यांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान केले. त्यानंतर परत बुधवारी रात्री सुळगा शिवारातील भात गंजी जळून खाक झाली. ती येळ्ळूर येथील गोविंद बसवंत धामणेकर यांची असून, त्यांचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. “आधीच दुष्काळ त्यात हा तेरावा महिना” अशी शेतकऱ्यांची स्थिती झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येत्या काळात आपल्या जनावरांना घालण्यासाठी चाऱ्याची अत्यंत कमतरता भासणार त्यात हे संकट. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर आपल्या गवत गंज्या राखण्यासाठी शेतात जाऊन वस्ती मारण्याची आली आहे.


Recent Comments