घटस्फोट दे अन्यथा तुझे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी पत्नीला देणाऱ्या नवरोबाला बेळगाव सीईएन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून आता या नवरोबाची हिंडलगा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
होय, महिला अत्याचाराच्या रोज नवनवीन घटना बेळगावात उघडकीला येत आहेत. त्यात दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोट दे अन्यथा, तुझे खासगी व्हीडिओ आणि फोटो व्हायरल करेन अशी धमकी पतीने स्वतःच्याच पत्नीला दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करण्याचा घाट घातला. यामुळे तो घटस्फोट घेण्यासाठी पत्नीला त्रास देत होता. तसेच, खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.
पतीच्या धमक्यांनी घाबरलेल्या पत्नीने त्याला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. पती किरणने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरही समाधान न मानता तो पत्नीला सतत ब्लॅकमेल करत होता.
पतीला समजावून सांगूनही काही फायदा होत नसल्याने हतबल झालेल्या पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात धाव घेतली. जिल्हा सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करून न्याय देण्याची विनंती केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून किरणला ठाण्यात बोलावून चौकशी केली. चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये पत्नीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता किरणने फरार होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांची सुटका करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पती किरणने रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या पत्नीने माझ्याविरोधात परवा रात्री तक्रार केली आहे. माझ्या मोबाईलमध्ये तिचे खासगी व्हिडिओ व फोटो आहेत हे खरे आहे, असे त्याने सांगितले. बाइट
किरण आता बरा झाल्याने त्याला काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, येथील एका पीडित महिलेने पोलीस ठाण्यात येऊन पती किरण पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून तो न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, किरण पाटील हा तिच्यासोबत असताना त्याने काही व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. तपासादरम्यान आरोपीला स्टेशनवर बोलावून त्याचा मोबाईल तपासला. महिलेने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आणि फोटो सापडले. त्या संदर्भात अटक करण्यात आली असता आरोपी पळून गेला. त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले, त्याची चूक त्याच्या डोळ्यासमोर सिद्ध झाली. या भीतीने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार केले. तपासात त्याच्याकडून चूक सिद्ध झाली असून आपण कायदेशीर कारवाई करू, असे सांगत तो पत्नीला ब्लॅकमेल करत होता. अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. महिलेचे म्हणणे आहे की तो दुसरे लग्न करण्याचा विचार करत होता आणि यामुळे तो घटस्फोट घेणार होता. आम्ही किरणचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर, या प्रकरणामुळे बेळगावात एकच खळबळ माजली आहे. घटस्फोटासाठी स्वतःच्याच पत्नीला तिचे खासगी फोटो व व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या नवरोबाला मात्र आता तुरुंगाची हवा खावी लागली आहे.


Recent Comments