Belagavi

बेळगावात मालाधारींकडून अय्यप्पास्वामींची भक्तिभावाने पूजा

Share

बेळगावातील शहापुरात अय्यप्पास्वामी मालाधारींनी भक्तीभावाने अय्यप्पास्वामींची पूजा केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अय्यप्पा स्वामींची महापूजा व महाप्रसादाचे दाणे गल्ली, भाजी मार्केट, शहापूर, येथे आज आयोजन करण्यात आले होते. आनंद रामा शिरुर यांच्या नेतृत्वाखाली बनधलेल्या या पूजेत अनेक अय्यप्पा मालाधारी भक्तिभावाने सहभागी झाले होते. पूजेनंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


या महापूजेत सोमू स्वामी, महांतेश स्वामी, विकास रामा शिरूर, चेतन पुजारी, लक्ष्मण हसनन्नावर, उमेश होसूर, विनायक भस्मे, विशाल सुतार, अयाज शहापूर आदी भाविक उपस्थित होते

Tags: