शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळ आणि संगीताचे कार्यक्रम पूरक आहेत, असे हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बंडी यांनी सांगितले.
येथील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी हिंडाल्को मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बंडी, एचआर व्यवस्थापक मयूर कृष्णा यांच्या हस्ते पारितोषिकांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना बंडी पुढे म्हणाले की, खेळात भाग घेतल्याने आरोग्यही सुधारते. सामाजिक सेवेत गुंतलेल्या संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने हिंडाल्को कंपनीतर्फे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात आणखी खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या आवारात झालेल्या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हजारो क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांनी सामन्याचे रोमांचक क्षण पाहिले आणि भरभरून कौतुकही केले. क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला आणि खेळाडूंना हिंडाल्को कंपनीकडून 1.75 हजार रुपयांची पारितोषके देण्यात आली.
तसेच समाजसेवा करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे कंपनीचे मानव संसाधन प्रमुख मयूर कृष्णा यांनी सांगितले. डॉटर्स ऑफ आश्रय फाउंडेशन, नंदन मक्कळ धाम, कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव, स्पंदन नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल, समृद्धी फाऊंडेशन फॉर डिसेबल्ड, विद्यार्थी शासकीय शाळा, शांताई वृद्धाश्रम अशा 7 संस्थांना एकूण 1.75 रुपये रोख देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आश्रम फाऊंडेशन नागरत्ना रामगौडा, विजय मोरे, कस्तुरी बेंगेरी, शिवनगौडा पाटील, दिनेश नायक आदी उपस्थित होते.


Recent Comments